- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व आयजीपी संदीप पाटील यांच्याकडून स्वागत
बेळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर मंगळवारी सायंकाळी बेळगाव दौऱ्यावर दाखल झाले. त्यांच्या आगमनावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) संदीप पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री डॉ. परमेश्वर यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी केली असून, विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.








