वडगाव : मूळचे येळळूर व सध्या आनंदनगर वडगाव येथील रहिवासी श्रीमती प्रेमा सिद्धोजी मुरकुटे (वय ८८ वर्षे) यांचे आज रविवार (दि. २७) रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक चिरंजीव,तीन विवाहित मुली,सुना,जावई,नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर आज रविवार दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता.वडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. नवहिंद क्रीडा केंद्राचे संस्थापक सदस्य व वडगाव शिवमंदिर विश्वस्त मंडळाचे ट्रस्टी प्रदीप सिद्धोजी मुरकुटे यांच्या त्या मातोश्री होत.








