• मूर्तीकुमार माने, प्रल्हाद पाटील यांचा दोन्ही मंडळांतर्फे सन्मान

येळ्ळूर : अष्टविनायक नगर, येळ्ळूर आणि विराट गल्ली, येळ्ळूर येथील गणेशोत्सव मंडळांना शिवोली (ता. खानापूर) येथील मूर्ती कुमार माने आणि प्रल्हाद पाटील यांनी प्रत्येकी १,००१ /- रुपयांची देणगी दिली.

देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन्ही मंडळांच्या वतीने मूर्तीकुमार माने आणि प्रल्हाद पाटील यांचा सन्मान करण्यात आला. मंडळाच्या कार्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल यावेळी त्यांचे आभार मानण्यात आले.