- माळी गल्लीतील ‘बेळगावचा लंबोदर’ गणेशमूर्तीचे सर्वप्रथम विसर्जन
बेळगाव : माळी गल्ली येथील एसएसजीयू मंडळाच्या ‘बेळगावचा लंबोदर’ सार्वजनिक गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी ३ वाजता उत्साहात काढण्यात आली. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात मिरवणूक मार्गक्रमण करत दुपारी ३.३० वाजता नवीन कपिलतीर्थ तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जनापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गंगा पूजन केले. त्यानंतर गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. माळी गल्ली येथील एसएसजीयू मंडळाची ‘बेळगावचा लंबोदर’ ही सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित होणारी पहिली मूर्ती ठरली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.








