• ओमकार पाटील ‘बेस्ट पोझर’ ; २२ व्या जिल्हास्तरीय स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंचे दमदार प्रदर्शन

बेळगाव : जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित २२ व्या ‘श्री गणेश २०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रवीण मजुकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा किताब पटकावला. उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू ओमकार पाटील याने प्रभावी सादरीकरण करत ‘बेस्ट पोझर’चा बहुमान मिळवला.

स्पर्धेत विविध वजनी गटांतील शरीरसौष्ठवपटूंनी आकर्षक आणि दमदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत उपस्थित क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. ५५ किलो गटात ऋत्विक लाखे, ६० किलोत श्रीहरी बेळगावकर, ६५ किलोत विकास शहापूरकर, ७० किलोत सुनील भातकांडे, ७५ किलोत प्रवीण मजुकर आणि ७५ किलोवरील गटात राहुल कुलाल यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्हास्तरीय ‘श्री गणेश २०२६’ या सर्वोच्च किताबासाठी ऋत्विक लाखे, श्रीहरी बेळगावकर, विकास शहापूरकर, सुनील भातकांडे, प्रवीण मजुकर आणि राहुल कुलाल यांच्यात अंतिम फेरीत चुरस रंगली. सर्व स्पर्धकांनी विविध पोझचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवली. अखेर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रवीण मजुकर यांनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’चा किताब पटकावला. ओमकार पाटील याने प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर ‘बेस्ट पोझर’चा पुरस्कार मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, श्रीधर शेट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, उद्योजक मिहीर पोतदार, गौतम सामंत, नवीनकुमार, सुहास चांडक, ईश्वर घाडी, विजय तलवार, सचिन उसुलकर, सदानंद शिरोडकर, शेखर नागरडोळेकर, राकेश कलघटगी, ‘मि. इंडिया’ सुनील आपटेकर, किशोर आगा, पुरस्कर्ते सचिन हंगिरगेकर, अमित किल्लेकर, गंगाधर व हेमंत हावळ आणि आशिया पंच अजित सिद्दण्णावर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व पदके देऊन गौरविण्यात आले.

  • अंतिम निकाल :
  • ५५ किलो :
    १) ऋत्विक लाखे (रॉयल फिटनेस)
    २) केतन भातकांडे (रॉ फिटनेस)
    ३) पांडुरंग पाटील (रुद्रा जिम)
    ४) रोहित संपले (फ्लेक्स जिम)
    ५) आकाश जोगणी (मेंनसे फिटनेस)
  • ६० किलो :
    १) श्रीहरी बेळगावकर
    २) रोहित माळवी (ब्रो नॉट फिट)
    ३) गणेश सानोलकर (रॉयल फिटनेस)
    ४) तुकाराम पाटील (ओम फिटनेस)
    ५) मंजुनाथ कलघटगी (हेक्स जिम)
  • ६५ किलो :
    १) विकास शहापूरकर (रॉ फिटनेस)
    २) पंकज गुरव (ओम फिटनेस)
    ३) अक्षय मधुकर (रॉ फिटनेस)
    ४) इरेश प्रभावळकर (नेक्स्ट फिटनेस)
    ५) आफताब किल्लेकर (गोल्ड लाईफ)
  • ७० किलो :
    १) सुनील भातकांडे (पॉलीहायड्रॉल जिम)
    २) विशाल (आयुर जिम)
    ३) ओम पाटील (गोल्ड जिम)
    ४) रितिक पाटील (रुद्रा जिम)
    ५) आकाश साळुंखे (रॉयल फिटनेस)
  • ७५ किलो :
    १) प्रवीण मजुकर (एमएलआयआरसी)
    २) नागेंद्र मडिवाळ (रुद्रा जिम)
    ३) गजानन पाटील (ई.वाय. फिटनेस)
    ४) पवन सावंत (बोलेरो फिटनेस)
    ५) बसाप्पा कोणकरी (हिंडलगा क्लब)
  • ७५ किलोवरील :
    १) राहुल कुलाल (नेक्स्ट फिटनेस)
    २) अमर गुरव (फिटनेस फॉर)
    ३) गजानन काकतीकर (बाल हनुमान जिम)
    ४) संगप्पा ए. (रॉयल फिटनेस)
    ५) ओलीस मेनसे (फ्लेक्स जिम)