• विसर्जनासाठी पाण्यात उतरला असता दुर्घटना

बेळगाव : शहरालगतच्या मच्छे गावात गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. विश्वनाथ नाईक असे मृत युवकाचे नाव आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेला विश्वनाथ नाईक विसर्जनावेळी पाण्यात उतरला होता. यावेळी तो पाण्यात बुडाला. उपस्थितांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र, या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे मच्छे गावासह परिसरात शोककळा पसरली असून, गणेश विसर्जनाच्या उत्साहावर या दुर्दैवी घटनेने विरजण पडले.