बेळगाव : कंग्राळी (खुर्द) रामदेव गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सैनिक श्री. निंगाप्पा गंगाजी गावडे (वय ७९) यांचे मंगळवार दि. ७ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन, मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज बुधवार दि. ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.