• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश

बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बुधवार, दि. ८ जुलै रोजी बेळगाव शहर व ग्रामीण, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुट्टी केवळ अंगणवाडी केंद्रे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी लागू असून, इतर शैक्षणिक संस्थांबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.