- २० सप्टेंबरला गणहोम, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद
बेळगाव : शाहपूर येथील नार्वेकर गल्लीतील बाल गणेश मंडळातर्फे रविवार, २० सप्टेंबर रोजी भव्य गणहोम, श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला सकाळी ७ वाजता भव्य गणहोमाने प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार असून, दुपारी १२ वाजल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी बेळगावचे नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांना मंडळाच्या वतीने विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख (PRO) विकास कलघटगी, बाल गणेश मंडळाचे उत्सव अध्यक्ष सागर पाटील आणि ‘हॉकी बेळगाव’चे सेक्रेटरी सुधाकर चाळके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण सुपूर्द केले.
पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी निमंत्रणाचा स्वीकार करून कार्यक्रमाला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याची ग्वाही दिली आहे.








