- मंत्री सतीश जारकीहोळींचे घूमजाव
- योग्य कागदपत्रांशिवाय कुणावरही आरोप करता येणार नाही
- सुवर्णसौधमध्ये माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर
बेळगाव : काही दिवसांपूर्वी ईडीच्या छाप्यांमागे कोण आहे, याची माहिती असल्याचे सांगणारे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुधवारी (दि. १६) आपल्या भूमिकेत बदल केला. ईडीच्या छाप्याला कारणीभूत ठरलेली तक्रार नेमकी कुणी दाखल केली, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुवर्णसौधमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, आवश्यक कागदपत्रे आणि उपलब्ध माहिती तपासल्यानंतरच ईडीच्या छाप्याशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य केले जाईल. योग्य कागदपत्रांशिवाय कुणावरही आरोप करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दलित समाजातील नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. आगामी काळात परिस्थितीचे निरीक्षण केले जाईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले.
दरम्यान, ईडीच्या कारवाईला कारणीभूत ठरलेली तक्रार नेमकी कुणी दाखल केली, याबाबत सध्या ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.








