बेळगाव : महापालिका आयुक्तांकडून किल्ला कोटेकेरी तलावाच्या विकास कामांची पाहणी करण्यात आली.गुरुवारी तलावाला भेट दिलेल्या महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अमृत योजनेअंतर्गत तलाव आणि परिसरात सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीची पाहणी केली. ठिकाणी असलेल्या अभियंत्यांकडून माहिती घेत त्यांनी काही सूचना दिल्या तसेच योजनेच्या आराखड्यानुसार निश्चित वेळेत व्यवस्थितपणे कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी पालिकेचे अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, अनूप, अमृत योजनेचे अभियंते, कंत्राटदार, विवेक मठद यांच्यासह पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
September 18, 2026
२० सप्टेंबरला गणहोम, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद बेळगाव : शाहपूर येथील नार्वेकर गल्लीतील बाल गणेश मंडळातर्फे रविवार, २० सप्टेंबर रोजी भव्य गणहोम, श्री सत्यनारायण महापूजा आणि […]








