बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव आयोजित सातवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २४ मे रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे संपन्न होत आहे. या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे शनिवार दि. १६ मे रोजी सायंकाळी संमेलनाचे उद्घाटक आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी परिषदेचे राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, उपाध्यक्ष डी‌. बी. पाटील, सचिव रणजित चौगुले, एस. वाय. घाडी, डॉक्टर संजीवनी खंडागळे, रोशनी हुंदरे, सविता वेसणे, नेत्रा मेणसे, गीता घाडी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.