- माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावमधील औद्योगिक विकासाला सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून आवश्यक जमीन उपलब्ध करत औद्योगिक क्षेत्राला नवी गती देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.








