बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या रुक्मिणी नगरमध्ये मुसळधार पावसामुळे एका कारवर भलेमोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. बेळगावात पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. शहरातील रुक्मिणी नगर येथे मुसळधार पावसामुळे घरासमोर उभ्या असलेल्या कारवर एक भलेमोठे झाड कोसळले. यामुळे कारचे मालक, रुक्मिणी नगर येथील प्रदीप हुलकुंड यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.