- इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ
आळंदी : आषाढी पायी वारी सोहळ्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसात, लाखो वारकरी देहू आणि आळंदीला पायी वारीसाठी पोहोचले आहेत. इंद्रायणी काठी आळंदी वसलीये अन् तिचे इंद्रायणी नदी दुथडी वाहत आहे. अशातच आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ही आहे. लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत आहेत. मात्र इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड होणार आहे. कारण माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यापूर्वी वारकरी या पवित्र इंद्रायणीत स्नान करतो अशी प्रथा आहे. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या प्रथेत खंड पडण्याची शक्यता आहे.