मण्णूर / वार्ताहर

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मण्णूर येथील कलमेश्वर हायस्कूलमध्ये नवीन बांधलेले टॉयलेट ब्लॉक शाळेला अभिमानाने सुपूर्द केले. या उपक्रमातून रोटरी दर्पणने शाळेतील विद्यार्थ्यांची स्वच्छता, आरोग्य आणि प्रतिष्ठा सुधारण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल उचलले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम महिला अ‍ॅन पद्मजा पै यांच्याहस्ते करण्यात आले. प्रारंभी शिक्षिका सरिता ओऊळकर यांनी स्वागत केले. यावेळी एजी रो. अ‍ॅड. महेश बेल्लद आणि आर. एम. चौगुले यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली.

आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा रो. रूपाली जनाज यांनी क्लबने मण्णूर गाव दत्तक घेतल्याचा प्रेरणादायी प्रवास आणि या उपक्रमाचा भाग म्हणून केलेल्या परिवर्तनकारी कामांबद्दल माहिती दिली. तर सचिव रो.शीतल चिलमी यांनीही प्रकल्प यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले.

यावेळी एजी रो. अ‍ॅड. महेश बेल्लद, रोटरी दर्पणच्या अध्यक्षा रो. रूपाली जनाज, रोटरी दर्पणच्या सचिव रो. शीतल चिलमी, एजी रो. पुष्पा पर्वतराव व मण्णूर येथील युवा नेते आर. एम. चौगुले, प्राचार्य वाय. के. नाईक, कार्यक्रमाच्या अध्यक्षा रो. आशा पाटील, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचे सदस्य यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.