बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा सहकारी संघाच्या उपनिबंधक म्हणून रंजना पोळ यांनी मागच्या आठवड्यात पदभार स्वीकारला होता. या निवडीविरुद्ध उपनिबंधक रवींद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांची मागणी मान्य करून उच्च न्यायालयाने आज रवींद्र पाटील यांची उपनिबंधक म्हणून फेरनिवड केली असून ते उद्या बुधवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.