बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील ट्रेकिंगचा छंद असलेल्या युवकांनी एकत्र येऊन प्रथमच केदारनाथ यात्रेला सुरुवात केली आहे. दि. १० ते २० जून २०२५ दरम्यान दहा दिवसांच्या या यात्रेकरिता बेळगाव शहरातून २५ युवक मार्गस्थ झाले आहेत.

बेळगाव ते केदारनाथ, सोनप्रयाग, बद्रीनाथ, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, धारादेवी, हरिद्वार, ऋषिकेश तसेच भारतातील पहिले गाव जिथून पांडवांनी स्वर्गात जाण्याचा मार्ग निवडला असे ‘माना’ गाव या सर्व क्षेत्रांना भेट देऊन सुमारे ५००० किमी प्रवास करत दि. २० जून रोजी ते पुन्हा बेळगावात परतणार आहेत. भगवान शंकरावर असलेल्या श्रद्धेपोटी ते ही यात्रा करत आहेत.

यामध्ये विनायक, राहुल, गणेश सचिन, श्री, राजू, प्रशांत, विवेक, अन्या, सुजल, आनंद, राहुल, महेश, विजय, सौरभ, स्वप्निल, राकेश, वैभव, अमित, सातेरी, संतोष, पुंडलिक, प्रथमेश, भरत, रोह्या आदि सहभागी झाले आहेत.