रायबाग : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात बोम्मनाळ येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली.

रायबाग रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार महांतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि त्यांच्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.