• ‘ग्रो-ग्रीन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : शहरातील हरित आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने ‘वीरशैव समाज सेवा समिती’च्या सहकार्याने सदाशिवनगर येथील गणाचारी रुद्रभूमी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

यावेळी श्री. शिवाजी कागणीकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करत उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

वृक्षारोपणासाठी मोफत रोपे उपलब्ध करून देत मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने आरएफओ प्रशांत गौराणी यांचे आभार मानण्यात आले. तसेच योग्य वेळी निर्णय घेऊन मोहीम यशस्वी करण्यासाठी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल रमेश कळसन्नावर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमात सहभागी झालेल्या ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या सदस्य आणि स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.