बेळगाव : आधार एज्युकेशन सोसायटी संचालित जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलने देशभक्तीपर गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साह, आत्मविश्वास आणि सांघिक भावनेने प्रभावी सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. परीक्षक म्हणून मनस्वी राचन्नावर आणि रुतिका उप्पारट्टी यांनी परीक्षण केले.
प्रीतम येळ्ळूरकर यांनी स्वागत केले. सहाना प्रभू आणि कुमारी प्रीती यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती संध्या यांनी आभार प्रदर्शन केले.








