• आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थीनींनी डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल, टिळकवाडी, बेळगाव आयोजित ‘सेंट मॅग्डालेन स्मृती आंतरशालेय स्पर्धा २०२६–२७’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला.

कु. आराध्या रेडेकर हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला. तसेच कु. जान्हवी कडेमणी हिनेही आपल्या गटातील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. दोन्ही विद्यार्थीनींना चषक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शालेय एस्.एम्.सी कमिटीचे अध्यक्ष प्रा. श्री. आर. के. पाटील, उपाध्यक्ष प्रो. श्री. आर. एस. पाटील, सचिव प्रा. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.