- शिवबसव गर्ल्स पीजीमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन
- परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्याचे आवाहन
बेळगाव : पाही वाईब्स फाउंडेशनतर्फे मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) बेळगावमधील काली आम्बराई येथील ‘शिवबसव गर्ल्स पीजी’मध्ये डेंग्यू प्रतिबंध आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या जनजागृती सत्रात घर व परिसरात पाणी साचू न देणे, परिसर स्वच्छ व कोरडा ठेवणे, डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि कोणत्या वेळी वैद्यकीय मदत घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डेंग्यूपासून बचावासाठी आवश्यक वैयक्तिक संरक्षणाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
बेळगाव अधिक आरोग्यदायी आणि सुरक्षित बनविण्यासाठी मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल ‘शिवबसव गर्ल्स पीजी’चे रहिवासी व व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले. विशेष सहकार्याबद्दल श्री. शिवानंद हिरेमठ यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.








