• पोलिस आयुक्तांचे आदेश

बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात शुक्रवारी (दि. २५) गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी सहा पासून ते रविवारी (दि. २७) सकाळी सहा पर्यंत मद्य विक्रीवर बंदी घातली आहे.
दोन दिवस मद्य विक्री बंद असणार आहे, असे कळविण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस बेळगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मद्य विक्री दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.