- ४२३ जणांची हिमोग्लोबिन तपासणी
बेळगाव : हॅपी हार्ट फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने भरतेश कन्नड माध्यम शाळेत ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात एकूण ४२३ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
आरोग्यविषयक या उपक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल पाही वाईब्स यांचे तसेच निरोगी समाज निर्माण करण्याच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल रोटे. रक्षायांचे विशेष आभार मानण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती एस. मास्तीहोळी आणि सचिव रोटे. ज्योती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.








