- चार आंतरजिल्हा चोरट्यांना अटक ; नंदगड पोलिसांची कारवाई
- २९ ग्रॅम सोने, २२० ग्रॅम चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त
खानापूर : नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या चार आंतरजिल्हा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २९ ग्रॅम सोने, २२० ग्रॅम चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नंदगड आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनांचा तपास सुरू असताना पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी बीडी गावाजवळ चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईबद्दल नंदगडचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे.








