येळ्ळूर : येथील सरकारी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्या वतीने नूतन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. आयु फाउंडेशन, बेलगाम आणि क्वालिटी ॲनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त सी. एस. आर. फंडातून हायटेक शौचालयाची उभारणी करण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळेमध्ये शौचालयास जाऊन येण्यास अडचणी येत होत्या. ही उणीव भरून काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेलगाम साउथ यांच्यातर्फे हायटेक शौचालयाची बांधणी करण्यात आली. या शौचालयाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेलगाम साउथ चे प्रेसिडेंट श्री. निलेश पाटील, सेक्रेटरी श्री. भूषण मोहिरे, आयु फाउंडेशन बेळगावचे मॅनेजिंग चिफ डॉ. मनोज सुतार, क्वालिटी ॲनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे एम.डी. श्री. अजित लोकुर, डायरेक्टर श्री. उदय जोशी त्याचबरोबर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. आर. एम. चलवादी, एसडीएमसी अध्यक्षा रूपा धामणेकर, उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर, सदस्य श्री. मूर्तीकुमार माने, जोतिबा पाटील, मारुती यळगुकर, विजय धामणेकर, चांगदेव मुरकुटे, सदस्या दिव्या कुंडेकर, रेश्मा काकतकर, प्रियांका सांबरेकर, अल्का कुंडेकर, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती एम.एस. मंडोळकर यांनी केले. तर आभार श्री. एस. बी. पाखरे यांनी मानले.