बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या सामाजिक , राजकीय आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे माजी नगरसेवक नेताजी नारायणराव जाधव यांचा अमृत महोत्सव करण्यासंदर्भात त्यांच्या हितचिंतकांची एक बैठक रविवारी मराठा मंदिर खानापूर रोड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे हे होते. प्रारंभी माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी समारंभाच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचना केल्या. बैठकीत माजी आमदार मनोहर किणेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर माजी नगरसेवक रमेश सोनटक्की, दत्ता उघाडे, शिवराज पाटील, शिवाजीराव हंगिरगेकर, लक्ष्मणराव होनगेकर यांनी विचार मांडले.

बैठकीस डी. के. पाटील, सुरेश जो. पाटील, जयवंत खनन्नूकर, प्रभाकर भकोजी, पी. जी. मंडोळकर, राजेंद्र भातकांडे, बाळकृष्ण कंग्राळकर, मनोहर होसुरकर, प्रदीप शट्टीबाचे, चंद्रकांत गुंडकल हे उपस्थित होते. या बैठकीत अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात यायची असे ठरवण्यात आले यासाठी अनंत लाड, राजाराम सूर्यवंशी, नितीन आनंदाचे, शिवराज पाटील, प्रकाश अष्टेकर, डी के पाटील, मालोजी अष्टेकर, व्ही. एस. जाधव (गुरुजी) यांची एक समिती तयार करण्यात आली. तसेच एक स्वागत समिती ही तयार करण्यात आली असून त्यावर सभासदाची समिती तयार करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले.गोपाळराव बिर्जे यांनी आभार मानले.