नवरात्री २०२६ : भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ रंग हे याच एकात्मतेचे प्रतीक आहेत. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा – अर्चा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग नवरात्र कोणत्या दिवसापासून सुरू होते यावर आधारित असतो. यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज रविवार दि. ११ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे.

- रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ : पहिली माळ
- रंग : केशरी (नारंगी)
- रंगाचे महत्त्व : केशरी रंग हा क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असल्यामुळे केशरी रंग शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे असे मानले जाते. हा रंग पावित्र्याशी जोडलेला आहे.








