नवरात्री २०२६ : नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. देवीची नऊ रूपे नऊ रंगाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे. यामुळेच नवरात्रीतील नऊ दिवस भाविक वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करतात.

  • मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२६ : तिसरी माळ
  • आजचा रंग : लाल
  • रंगाचे महत्त्व : लाल रंग आवड, शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या लाल रंग हा शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग प्रेम आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग धोका आणि सावधता दर्शवण्यासाठीही वापरला जातो. लाल रंग अतिशय आकर्षक असतो. लाल रंगाचा वापर घरातील सर्व शुभकार्यांसाठी प्रथम केला जातो. कपडे किंवा पूजेची फुले यासाठी लाल रंगाची प्रथम निवड केली जाते. याशिवाय लाल रंगात उबेची भावनाही असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवितो.