• महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे भव्य वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
  • तीन गटांतील विजेत्यांचा गौरव

बेळगाव : भविष्यातीAल लेखक, कवी आणि नेतृत्व घडविण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकला, विचारशक्ती आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन ही काळाची गरज आहे. स्पर्धेत विजयी झालेल्यांचे अभिनंदन आहेच; मात्र सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचेही कौतुक करायला हवे. राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्यामुळे सीमाभागात मराठी भाषेसाठी विविध उपक्रम राबविण्यास बळ मिळत आहे, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वरेरकर नाट्य मंदिर येथे आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या स्पर्धेला प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन रमेश पावले आणि रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते, तर हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन अॅड. महेश बिर्जे आणि मदन बामणे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले.

यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, सी.ए. सोमशेखर सुतार, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील, शिवराज पाटील, अमित देसाई, प्रशांत भातकांडे, संतोष कृष्णाचे, उमेश पाटील आणि सुहास हुद्दार आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात ४०, माध्यमिक गटात ३० आणि महाविद्यालयीन गटात २० अशा एकूण ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून प्रा. परसु गावडे, प्रा. मयूर नागेनहट्टी, प्रा. सुरेश पाटील, वाय. पी. नाईक, बसवंत शहापूरकर, प्रा. सोनाली कांगले आणि प्रा. सुनीता कणबरकर यांनी काम पाहिले.

  • प्राथमिक गटातील विजेते

१. प्रथम : अथर्व विठ्ठल गुरव – मराठी विद्यामंदिर, तडशिनहाळ
२. द्वितीय : भूमी म्हात्रू भातकांडे – बालिका आदर्श
३. तृतीय : अदिती दिनकर परमोजी – मराठी विद्यानिकेतन
४. चतुर्थ : भावेश संतोष चोपडे – सरकारी मराठी प्राथमिक शाळा, इदलहोंड
५. पाचवा : शौर्य शिवाजी अंबुलकर – व्ही. डी. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज

  • माध्यमिक गटातील विजेते

१. प्रथम : सृजन अनिल पाटील – मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
२. द्वितीय : क्रांती मारुती पाटील – जनता विद्यालय, तुर्केवाडी
३. तृतीय : साईराज राम गुरव – मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
४. चतुर्थ : वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर – महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर
५. पाचवा : पूर्वी रमेश घाडी – महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर

  • महाविद्यालयीन गटातील विजेते

१. प्रथम : आरती गोरल – भाऊराव काकतकर महाविद्यालय, बेळगाव
२. द्वितीय : अनुजा लोहार – कला व वाणिज्य महाविद्यालय, कोवाड – चंदगड
३. तृतीय : सानिका कांबळे

उत्तेजनार्थ पारितोषिके : भावना पाटील (बेळगाव), प्रांजली मारुती कणबरकर (आर.पी.डी. महाविद्यालय) आणि अश्विनी गावकर (मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, बेळगाव).

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, डी. बी. पाटील, अमर येळ्ळूरकर, सुनील बाळेकुंद्री, किरण धामणेकर, सागर पाटील, बाळू गोरल, युवराज पाटील आणि महेश गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासु सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, खजिनदार विनायक कावळे, चिटणीस प्रतीक पाटील यांच्यासह सुरज कडूचकर, संतोष कृष्णाचे, किरण हुद्दार, साईनाथ शिरोडकर, महांतेश अलगोंडी, शेखर तळवार, किरण मोदगेकर, आशिष कोचेरी, आकाश भेकणे, साईराज जाधव, निखिल देसाई, सुरज चव्हाण, प्रवीण रेडेकर, रोहन कुंडेकर, अशोक पाटील, महेश चौगुले, ओंकार चौगुले, विकास भेकणे, प्रवीण कोराने, प्रवीण धामनेकर, शुभम कांबळे आणि आदित्य कांबळे यांनी परिश्रम घेतले. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले.