कोवाड / लक्ष्मण यादव

गेली १० ते १२ वर्षे कोवाड येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील घरांच्या मागील व समोरील बाजूस माती व खडक घसरून होणारी पडझड व नुकसानी संदर्भात कोवाडचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर हे सतत कोवाड ग्रामपंचायत , सर्कल , तहसीलदार व प्रांत कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा करत होते.

या समस्यांबाबत १५ दिवसांपूर्वी आमदार शिवाजीराव पाटील यांना लक्ष्मण मनवाडकर, लक्ष्मण यादव, गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करून या पडझडी थांबवण्यासाठी व होणारे नुकसान टाळण्यासाठी आम्हाला संरक्षक भिंतीची गरज असल्याचे सांगितले होते. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी सर्व समस्या तहसीलदारांना सांगून कोवाडला येऊन स्वतः समस्या जाणून घेतो असे आश्वासित केले होते. त्यानुसार आमदार शिवाजीराव पाटील आणि तहसीलदार राजेश चव्हाण यांनी तातडीने लक्ष्मीनगर वसाहतीत येऊन सर्व ठिकाणची पाहणी केली. तसेच याकामी सर्व शासकीय मदत करून संरक्षक भिंतीसाठी मदत करू अशी ग्वाही दिली.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिग्विजय देसाई , राम मनवाडकर, राजू मुल्ला, बाळू महागावकर, सोहेल मुल्ला, परशराम पाटील,  विनोद पाटील, संदीप पाटील, सुधीर पाटील, बाळू साळुंखे इत्यादी उपस्थित होते.