बिजगर्णी / वार्ताहर

विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे.अवांतर वाचन केल्यास आयुष्य समृद्ध बनते.विधायक कार्य करीत रहा.अभ्यास केल्यानं करिअर घडते विद्यार्थी दशेत अवांतर वाचन करून आपले समृद्ध करा. सातत्य जिद्द, चिकाटीने परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका. ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.कौतुक करणे, प्रोत्साहन प्रेरणा देणे आवश्यक आहे असे भावोत्कट विचार वाय. पी. नाईक यांनी बिजगर्णी हायस्कूलमध्ये विद्यार्थी सन्मान सोहळ्यात व्यक्त केले. प्रमुख वक्ते म्हणून ते उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी केले. ईशस्तवन व स्वागतगीत विद्यार्थ्यिनिनी सादर केले फोटो पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. गुलाबपुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी आदर्श सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव अध्यक्षस्थानी होते.

बिजगर्णी शिक्षण संस्थेचे सचिव ए. एल. निलजकर, उपाध्यक्ष सातेरी जाधव, निवृत्त मुख्याध्यापक धनाजी कांबळे गुरुजी यांचा प्रशालेतर्फे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावर्षी दहावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम,शाल, भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक प्रतिक्षा भास्कर 88%, प्रियांका मोरे 75%, तृतीय क्रमांक अनिकेत भास्कर 74%, दरवर्षी ए. एल. निलजकर यांच्याकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येते, तसेच एस.एम.जाधव यांच्या कडून दप्तर, वह्या,पेन, कंपास बॉक्स वितरित करण्यात येते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी डी. एस. कांबळे, यशवंतराव मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर यल्लापा बेळगावकर, पुंडलिक जाधव, ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक,एम. एम. जाधव, कल्लापा अष्टेकर, अप्पासाहेब जाधव, मनोहर पाटील, अशोक कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, बबलू नावगेकर, चंद्रभागा जाधव, माजी मुख्याध्यापक वाय. एच. पाटील, सातेरी जाधव,लक्ष्मण जाधव, एम. पी. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.  सूत्रसंचालन अरुण दरेकर यांनी तर आभारप्रदर्शन के.आर.भास्कर यांनी केले. या कार्यक्रमाला बिजगर्णी व कावळेवाडी गावातील पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .