• नदी परिसरातील पिकांना धोका

बेकिनकेरे / वार्ताहर

मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळख जाणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात मार्कंडेय पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदी परिसरातील पिकांना धोका निर्माण झाला आहे.
यंदा मे महिन्यात झालेल्या पावसाने शेती कामे खोळंबली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी व लागवड केली आहे. मात्र आता पावसाने जोर वाढविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील पिकांना धोका निर्माण झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.