बेळगाव / प्रतिनिधी

आधार शिक्षण संस्थेच्या मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली. प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम संयोजनासाठी शिक्षक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.