• अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजन
  • तीन गटांत होणार स्पर्धा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य मंदिरात ही स्पर्धा होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठावर बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, वक्तृत्वकलेला प्रोत्साहन मिळावे आणि आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन गटांत स्पर्धा होईल.

  • प्राथमिक गट (इयत्ता ४ थी ते ७ वी)
  • मोबाईल गेम की मैदानी खेळ?
  • माझी प्रेरणा : छत्रपती शिवाजी महाराज
  • मी शिक्षणमंत्री झालो/झाले तर?
  • मातृभाषेतून शिक्षण : काळाची गरज
  • माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी)
  • मोबाईल स्मार्टफोन : मानवाचा सेवक की मालक?
  • शेती आणि शेतकऱ्यांपुढील आव्हाने
  • मराठी भाषा टिकविण्यासाठी माझे योगदान
  • पर्यावरण संवर्धन : आजची गरज, उद्याची जबाबदारी
  • महाविद्यालयीन गट (इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर)
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : काळाची गरज की भविष्यातील धोका?
  • जेन-झी आंदोलन : नव्या काळातील क्रांती?
  • मराठी भाषा संवर्धन : युवकांची भूमिका
  • डिजिटल भारत : संधी, आव्हाने आणि भविष्य

प्रत्येक स्पर्धकाने संबंधित गटातील चारपैकी एका विषयाची निवड करायची आहे. विजेत्यांना प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत युवा समिती कार्यालय, टिळकवाडी, बेळगाव येथे किंवा आयोजकांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. प्रत्येक गटातील पहिल्या ३० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क :
श्रीकांत कदम : ७०१९६६८०२५ , प्रतीक पाटील : ७३३८१४५६७३ , आशिष कोचेरी : ९८८६१०३३७३

अधिक माहितीसाठी : अंकुश केसरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव : ९७३९९६३२२९