- उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्वाचा गौरव
बेळगाव : जागतिक उद्योजक दिनानिमित्त २७ ऑगस्ट २०२६ रोजी BNI Champions Chapter, Belgaum येथे आयोजित विशेष कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला.
या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना व्यवसाय क्षेत्रातील अनुभव आणि उद्योजकतेविषयीचे विचार मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनातून डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांनी उद्योजकतेसोबत सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ यश मिळविणे हा उद्योजकतेचा उद्देश नसून, नम्रता जपत समाजाशी जोडलेले राहणे, मूल्यनिर्मिती करणे आणि समाजाला काहीतरी परत देण्याची भावना जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजकता, नेतृत्व, नम्रता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल रोटे. गीता गायकवाड यांचे आभार मानण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदविणाऱ्या सर्व सदस्यांचेही आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.








