बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. हिरेबागवाडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.

एका ट्रकने दुचाकीस्वार असलेल्या दोघांना चिरडले.अपघाताच्या तीव्रतेमुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. हुबळी येथील रहिवासी शिवप्पा शहापूर आणि नंदगड येथील रहिवासी रफिक जांबोटी अशी मृतांची नावे आहेत. तर अन्य ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन ट्रक, एक कार आणि दोन दुचाकींमध्ये हा साखळी अपघात झाला. या अपघातामुळे पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.