बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नीती आयोग पुरस्कृत नवी दिल्ली येथील वर्दी वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या मौलिक योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल आधार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉक्टर डी. टी.बामणे आणि संचालक मंडळाने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.








