बेळगाव : फ्रीमेसन्स लॉज व्हिक्टोरिया नं. ९ , च्या केअर फॉर नेचर उपक्रमासाठी दिलेल्या उदार सहकार्याबद्दल पहि व्हाइब्स फाउंडेशन संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. या निस्वार्थ योगदानामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून भविष्यातील पिढ्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. संस्थापक संचालक रक्ष यू यांनी सिद्धार्थ चंदगडकर यांचे विशेष आभार मानले असून त्यांनी २००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देणगी दाखल दिली आहे. सदर टाकी बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील वृक्षसंवर्धनासाठी उपयोगी ठरणार आहे. उपक्रमाचे समन्वयक म्हणून रतन सिंग ठाकूर यांनी केलेल्या प्रामाणिक व समर्पित कार्याचेही कौतुक करण्यात आले आहे. डॉ. सुबोध किट्टूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे. फ्रीमेसन्स लॉज व्हिक्टोरिया नं. ९ , बेळगावच्या सर्व सदस्यांचे तसेच पहि व्हाइब्स फाउंडेशनच्या सहकार्य व हरित भविष्यासाठीची बांधिलकी कौतुकास्पद असून त्यांच्या योगदानाचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
April 28, 2026
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांचे निर्देश बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना, सरकारने दिलेल्या आदेशानुसार जनगणनेचे महत्त्वाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण […]







