• सिमोल्लंघन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे प्रा. आनंद आपटेकर यांचे आवाहन

बेळगाव : ऐतिहासिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेला बेळगावचा पारंपरिक सिमोल्लंघन सोहळा आज, मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठी विद्यानिकेतन मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. बेळगावच्या दसरा उत्सवाची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संस्कृतीचा मान वाढवावा, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र-दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बेळगावच्या ऐतिहासिक दसरा उत्सवाला लाभलेली परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून या ऐतिहासिक सिमोल्लंघन सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे निमंत्रण महामंडळाने दिले आहे.

मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र-दसरा महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर यांनी बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान जपण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.