• बुसान, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन सादर करणार

बेळगाव : दिल्ली येथे सुपर स्पेशालिटी वैद्यकीय शिक्षण घेत असलेले डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांनी हृदयविकार क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे.

कार्डिओलॉजी (हृदयरोग) विषयातील त्यांचा प्रबंध हा एशिया पॅसिफिक हार्ट रिदम सोसायटी (Asia Pacific Heart Rhythm Society) या प्रतिष्ठित संस्थेने निवडला आहे.

या निवडीमुळे त्यांना आपले संशोधन दिनांक २२ व २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बुसान, दक्षिण कोरिया येथे चार दिवस होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेला जगभरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

डॉ. निखिल हे अक्कोळ येथील नामवंत डॉ. संजय व सौ. श्रद्धा पंतबाळेकुंद्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी व सादरीकरणासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.