• दोघांना अटक ; कॅम्प व खडेबाजार परिसरात छापे
  • मुद्देमाल जप्त

बेळगाव : शहरातील कॅम्प आणि खडेबाजार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारू व मावा विक्रीवर धडक कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे.

कॅम्प परिसरात पीएसआय रुक्मिणी ए. आणि त्यांच्या पथकाने असदखान दर्ग्याजवळ छापा टाकून गणेशपुर येथील पप्पू राजाराम कुदळे याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे १० लिटर अवैध दारू व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

दरम्यान, खडेबाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय आनंद अडगोंडा यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन क्रॉसजवळ कारवाई करत कोनवाळ गल्लीतील पांडू मंजप्पा पुजारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माव्याची २० पाकिटे जप्त करण्यात आली.

या दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईचे पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी कौतुक केले आहे.