बेळगाव : राकसकोप जलाशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे बेळगाव शहरातील पाणीपुरवठ्यात शुक्रवारपासून ६० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. पाणीपातळी घटल्याने मृतसाठ्यातील पाण्याचा उपसा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
सद्यस्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ १५ दिवस पुरेल इतका असल्याचे स्पष्ट झाले आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास शहरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टंचाईमुळे यापूर्वी आठ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता दहा दिवसांच्या अंतराने करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार राकसकोप जलाशयातील पाणी ७ जुलैपर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाने दिली आहे.








