बेळगाव : भारताचे गृहमंत्री अमित शाह हे शनिवार, दि. २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्यापूर्वी कोल्हापूर येथील श्री शिवाजी विद्यापीठ गेटजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.








