• मटका, जुगार, गांजा सेवन आणि मद्यप्राशनप्रकरणी १४ जणांना अटक

बेळगाव : बेळगावमधील माळमारुती, एपीएमसी आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार, गांजा सेवन आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माळमारुती पोलिसांनी मटका प्रकरणी मंजुनाथ यल्लाप्पा तिगडी आणि परसप्पा रायप्पा अल्ला या दोघांना अटक केली.

एपीएमसी पोलिसांनी जुगार आणि गांजा सेवन प्रकरणी शानूर मेहमूद संठी, महम्मदहनीफ मुक्तुम हुसेन मुनियार, इद्रीश रसूल शेख आणि खुर्शीद आलम शण्णीर अहमद अदखान या चौघांना ताब्यात घेतले, तर गांजा सेवन करणाऱ्या शाहीद शरद शेख यालाही अटक केली.

मार्केट पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या संतोष बाबू दळवी, ज्योतिबा दशरथ शहापूरकर आणि दर्शन महावीर शेरी यांच्यावर गुन्हा नोंदवला. दुसऱ्या एका कारवाईत सुरेश बाळप्पा व्यापारी, विनायक शंकर सावंतगावकर आणि अमृत शंकर नेकार यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या सर्व १४ आरोपींवर कायदेशीर कारवाई करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.