• विनय कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन
  • अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील कंग्राळी बी.के. , कंग्राळी के.एच. , आंबेवाडी, मण्णूर, गोजगे, उचगाव, हिंडलगा, सुळगा, कल्लेहोळ, बेनकनहळ्ळी, बेळगुंदी, बीजगर्णी, सोनोली, बेळवट्टी, कुद्रेमणी, तुरमुरी, बेकिनकेरे आणि अतिवाड परिसरातील शेती व घरगुती वीजपुरवठा अनियमित होत असल्याबाबत भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीणच्या वतीने हेस्कॉम अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.

भाजप नेते विनय विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा सेक्शन ऑफिसर राघवेंद्र, कोलकार तसेच बेनकनहळ्ळी सेक्शन ऑफिसर सचिन यांना निवेदन देण्यात आले. गणेश चतुर्थीच्या तोंडावर शेतीसाठीचा तसेच घरातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वीजपुरवठा सुरळीत न केल्यास हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला. यानंतर हेस्कॉम अधिकाऱ्यांनी शेतीसाठी तसेच घरातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा रयत मोर्चा अध्यक्ष संजय यलूपा पाटील, वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगावचे अध्यक्ष परशुराम राजाराम तुप्पट, मराठा संघटन संयोजक पिराजी वेताळ, ज्योतिर्लिंग मल्टीपर्पजचे चेअरमन आर. आर. चौगुले, महाशक्ती केंद्रप्रमुख संजय मोरे, शालू फर्नांडिस, शक्ती केंद्रप्रमुख खाचु तरळे, सुरज पाटील, विजय कुनुरकर, सुनील पाटील, अनिल मद्यपगोळ, भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, युवा मोर्चा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील, देवाप्पा शिंदे, हेमंत कुलकर्णी, राजेंद्र कांग्राळकर, विलास पाटील, उमेश चोरसे, राजू पोटे, यल्लाप्पा पाटील, भैरू आनंदाचे आणि ब्रह्मानंद पाटील उपस्थित होते.