कावळेवाडी : येथील श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या तर्फे गावात दिवाळीच्या निमित्ताने छोट्या मुलांनी ऐतिहासिक किल्ले प्रतिकृती तयार करून इतिहास जागवला.हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देतात ते किल्ले.याची एक आठवण म्हणून गावात विविध पस्तीस किल्ल्यांचे आकर्षक देखावे तयार उभे होते.
मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री दूर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाने पुढाकार घेऊन रायगड किल्ला प्रथम क्रमांक, प्रतापगड द्वितीय क्रमांक अशाप्रकारे सर्व मुलांना गौरव पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जोतिबा ओऊळकर, हणमंत यळ्ळूरकर, यल्लाप्पा ओऊळकर, पुंडलिक मोरे, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.








