• आठ तासांत साकारले चित्र

बेळगाव : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी कृष्णधवल रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या कलाकृतीतून त्यांनी नाना पाटेकर यांचे व्यक्तिचित्र साकारले आहे.

वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये ही रांगोळी रेखाटण्यात आली असून, ती पूर्ण करण्यासाठी अजित औरवाडकर यांना सुमारे आठ तास लागले. कृष्णधवल रंगसंगतीत साकारलेल्या या कलाकृतीतून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

ही रांगोळी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत ज्योती फोटो स्टुडिओमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध असेल.