बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने काही उपनगरांत रविवार दि. ६ रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम शहर विभागाने कळविले आहे.

राणी चन्नम्मानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर पहिला ते दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेरगिन गल्ली, व्हडर छावणी, डोर गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर बस्ती गल्ली, माधव रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर १० क्रॉस, रानडे कॉलनी पहिला ते दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन व परिसर, आनंदवाडी, अनगोळ, वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, सत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथपेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलबी, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉस, पटवर्धन लेआऊट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, नाय पै सर्कल, जेल शाळा, गोमटेश या भागाचा वीजपुरवठा रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खंडित होणार आहे.

श्रीनगर परिसरातील चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर परिसर, महांतेशनगर सेक्टर नं. ८ ते १२, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी परिसर, शिवबसवनगरचा काही भाग, एसबीआय ते धर्मनाथ भवन, अशोकनगर, कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल, वीरमद्रनगर, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वार्टर्स, केएसआरटीसी क्वॉर्टर्स, त्रिवेणी हॉटेल परिसर, मेटगूड हॉस्पिटल, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, काकतीवेस, क्लब रोड, डीसी ऑफिस, कोर्ट कंपाऊड, अलारवाड परिसरातील केएचबी कॉलनी, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी लेआऊट व या गावातील शेती पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.

वृद्धाश्रम परिसर, अलारवाड, सुवर्णसौध लाईन १ व २, बसवेश्वर चौक, शहापूर परिसरातील जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्छू गल्ली परिसर, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड या भागात सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार आहे.

  • उचगाव, हिंडलगा परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

बेळगाव दुरुस्तीच्या कारणास्तव ११० केव्ही उचगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या काही गावांचा वीजपुरवठा रविवार दि. ६ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत खंडित होणार आहे.

बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकॉप, कुंद्रेमनी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसूर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनवाडी, वाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी महाविद्यालय, गणेशपूर.

हिंडलगा उपकेंद्रावरून वितरण होणाऱ्या हिंडलगा पप हाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांतीनगर, मारुतीनगर, शिवमनगर, गोजगा, आंबेवाडी व तेथील शेती पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे.